अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नारायण राणेंच्या घरी गेले आहेत.

Updated: Aug 28, 2017, 05:49 PM IST
अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी title=

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नारायण राणेंच्या घरी गेले आहेत. राणेंच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दानवे गेले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा संदेश घेऊन दानवे हे राणेंच्या भेटीला गेले आहेत.

काल रात्री उशीरा अमित शहा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दानवे यांची बैठक झाली होती. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्ष संघटनेत बदल आणि राणेंबाबत चर्चा झाली होती.   याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नारायण राणेंच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. त्यातच भाजपचे बडे नेते राणेंच्या घरी जात असल्यामुळे या चर्चा आणखी जोर धरू लागल्या आहेत.