नागरिकांच्या संतापानंतर रामदास कदमांचा प्लास्टिकबंदी संदर्भातला नवा निर्णय

प्लास्टिकबंदीला मनसेचा विरोध हा व्यापारी हिताचा आणि सुपारीबाज राजकारणाचा परिणाम असल्याचा आरोप

Updated: Jun 28, 2018, 11:01 AM IST

मुंबई : राज्यात आजपासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार आहे... किराणा आणि इतर दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुट्ट्या वस्तू बांधून देऊ शकतात... त्यासाठी नवं परित्रक काढण्यात येणाराय, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी झी २४ तासच्या मुक्तचर्चा कार्यक्रमात बोलताना केली... प्लास्टिकबंदीला मनसेचा विरोध हा व्यापारी हिताचा आणि सुपारीबाज राजकारणाचा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

'भाजपास उद्ध्वस्त करू'

कोकणात भाजपनं नाणार प्रकल्प आणल्यास त्या पक्षाला उद्धवस्त करू, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिलाय... झी २४ तासवरील मुक्त चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते... आम्हाला सहज मंत्रीपदं मिळालेली नाहीत... आम्ही शिवसेनेत ५० पावसाळे खर्ची घातलेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं समर्थनही केलं.