मुंबई : शिवसेना काय निर्णय घेईल, हे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत. आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, आम्ही एकटे लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू. हा निर्णय शिवसेनेने आधीच घेतलाय. त्यामुळे युतीची स्वप्ने पाहू नका, असा सल्ला देताना आमच्या ठेकूवर तुम्ही आहात, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपलाच दिलाय.
भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलत होते. शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं, याकडे लक्ष देऊ नका, पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं मुनगंटीवार विरोधकांना उद्देशून म्हणाले. त्यावर रामदास कदम यांनी जहाल प्रतिक्रिया दिलेय.
आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत. ही निवडणूक आम्ही स्वबळावर निवडून सत्ता स्थापणार यात शंका नाही. आता भाजपचा अगदीच नाईलाज झालाय. आता तुम्ही म्हणतायेत शिवसेनेशी युती करणार आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यात जे काही शिजत आहे आणि आहे. ते कृपया डोक्यातून काढून टाका.
ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या ठेकूवर तुमची सत्ता आहे. आम्हाला काय वागणूक देताय, याकडे महाराष्ट्र पाहतोय. हे आम्ही कदापी विसरणार नाही, अशा कडक इशारा रामदास कदम यांनी दिलाय.