राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2018, 05:06 PM IST
राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड title=

मुंबई : राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. 

भाजपचे प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन आणि नारायण राणे असे तीन खासदार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आलेत. काँग्रेसच्यावतीने कुमार केतकर पहिल्यांदाच खासदार बनलेत. 

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेचे अनिल देसाई यांची राज्यसभेची ही दुसरी टर्म असणार आहे.