मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या दौ-यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. चार जूनला ही भेट होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या भेटीबाबत अजून निर्णय झालेला नसल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
राज ठाकरे सध्या देशात चर्चेत आहेत. कारण राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात हत्यार उपसलं आहे. भोंगे काढले नाही तर समोरच हनुमान चालिका लावू अशी थेट भूमिकाच त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम ही दिला आहे.
राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मु्द्द्यासाठी शिवसेनेची ही तारेवरची कसरत सुरु आहे. मनसे अध्यक्षांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ही अयोध्या दौरा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी ही जाहीर सभा जाहीर केली.
राज ठाकरे यांनी भोंग्याबाबतच्या निर्णयावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अल्टिमेटम दिला पण यूपीमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले. योगींनी सर्व धर्मांच्या लोकांसोबत बैठक घेऊन भोंग्याच्या आवाजावर मर्यादा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरे यांची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याची राज्यात चर्चा आहे. त्यामुळे दोघांमध्ये यूती होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.