झेंड्याचा मान राखा कारण... राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. 

Updated: Jan 23, 2020, 08:59 PM IST
झेंड्याचा मान राखा कारण... राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात पार पडलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. सहा वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या दिवशी हा झेंडा बाहेर काढण्याचा विचार राज ठाकरे यांच्या मनात आला होता. 

'झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. झेंडा हाती घेतल्यानंतर तो कोठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये. तर झेंड्याचा मान राखला गेलाच पाहिजे.' असे आदेश राज ठाकरे यांनी समस्त मनसैनिकांना दिले आहे. 

त्याचप्रमाणे राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकीच्या काळात वापरायचा नाही. त्यावेळी पक्षचिन्ह असलेला असलेला झेंडा वापरण्याचे आदेश राज ठाकरे यांनी अधिवेशनात दिले आहे. पक्ष नवा झेंडा, नवा विचार आणि नवी वाटचाल घेत पुढे जात आहे. 

मनसेचा नवा भगवा झेंडा आणि त्यावर विराजमान शिवरायांची राजमुद्रा बरंच काही सांगून जात आहेत. हे नवं भगवं निशाणानं मनसेमध्ये नवा जोश आणि नवी दिशा भरणार आहे. तर ९ फेब्रुवारी रोजी मनसेने एका मोर्चेचं आयोजन केलं.  

पाकिस्तानी आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. मोर्चाला उत्तर हे मोर्चानेच दिलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

या अधिवेशनात राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तर आता ९ फेब्रुवारी रोजी  काढण्यात आलेल्या मोर्च्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.