राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या, मारहाणीचा हाच तो व्हिडीओ

भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता. 

Updated: Nov 5, 2017, 04:21 PM IST

मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी करीरोड येथे ट्रॅफीक पोलिस कारवाई करत असताना गाडीतील एका व्यक्तीनं पोलिसालाच मारहाण केली होती. 

मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीला स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता.