राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पुन्हा भाजपवर निशाणा

ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2017, 09:35 PM IST
राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पुन्हा भाजपवर निशाणा title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधतांना ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.

ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या बातमीचा संदर्भ

बाजूला यूपी पालिका निवडणुकीत मतदार याद्यांत आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची बातमी देण्यात आली आहे. या बातमीचा संदर्भ हा व्यंगचित्रासाठी देण्यात आला आहे. 

मतदारांची नावे उडवणे, ईव्हीएम गडबड आणि संताप

मतदारांची मतदान यांद्यामधून नावे उडवणे, तसेच ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली देताना राज्याचे निवडणूक आयुक्त एस के अग्रवाल यांच्या संतापाचा भडका पत्रकार परिषदेत उडाल्याचा, संदर्भ बातमीत देण्यात आलेला आहे.

उत्तर प्रदेशातील पालिका निवडणुकीवर लावलं प्रश्नचिन्ह

एकंदरीत भाजपने उत्तरप्रदेशात पालिका निवडणुकीत बहुमताने जिंकलेल्या जागा, या ईव्हीएममशीनच्या मदतीने भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता उघडतात, अशी टीका राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.