Railway Megablock : आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. अशावेळी अनेकजण नवीन वर्ष साजरा करण्यासाठी किंवा वर्षाची सुरूवात चांगली व्हावी म्हणून देवदर्शानासाठी बाहेर पडतात. मात्र आज तुम्ही रेल्वेने प्रवास करणाक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज (Sunday, 1 january 2023) मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर (Mumbai Suburban Railway) नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन स्लो लाईनवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी स्लो मार्गावरील रेल्वे वाहतूक अप आणि डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे. फास्ट मार्गावरील वळवलेल्या अप आणि डाऊनच्या स्लो ट्रेन सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्टेशनांवर थांबणार आहेत.
वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग
पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai - Mumbai CSMT or CSMT Mumbai) ते वाशी या मार्गावर विशेष गाड्या धावतील.
जुईनगर ते पनवेल अप आणि डाऊन लाईनवर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. ठाणे ते वाशी रेल्वे वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसणार.
प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.