पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा

आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुरती थांबली आहे .मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सध्याच्या स्थिती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक ठप्प आहे. ठाण्याला येणाऱ्या सगळ्या लोकलही कारशेडला रवाना करण्यात येत आहेत.

Updated: Aug 29, 2017, 04:13 PM IST
पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा title=

मुंबई : आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुरती थांबली आहे .मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सध्याच्या स्थिती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक ठप्प आहे. ठाण्याला येणाऱ्या सगळ्या लोकलही कारशेडला रवाना करण्यात येत आहेत.

एल्फिस्टन रोड स्टेशन रिसरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे. चर्चेगट - दादर लोकल सेवा ठप्प आहे. तर दादरपासून डहाणूकडे जाणारी वाहतूक सेवा सुरू झाली आहे. सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. माटुंगा रेल्वे स्टेशनवरही पाणी साचलं आहे.