'तेजस'मधून गार्डनंच पळवले 'हॅन्डशॉवर', चोरी सीसीटीव्हीत कैद

मुंबई ते गोवा सुपर फास्ट एक्सप्रेस 'तेजस'ची पहिल्याच दिवशी प्रवाशांनी नासधूस केली असून तब्बल १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस मधील हेडफोन चोरल्याची घटना समोर आली होती. या प्ररकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय. 

Updated: Aug 18, 2017, 11:31 AM IST
'तेजस'मधून गार्डनंच पळवले 'हॅन्डशॉवर', चोरी सीसीटीव्हीत कैद  title=

मुंबई : मुंबई ते गोवा सुपर फास्ट एक्सप्रेस 'तेजस'ची पहिल्याच दिवशी प्रवाशांनी नासधूस केली असून तब्बल १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस मधील हेडफोन चोरल्याची घटना समोर आली होती. या प्ररकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय. 

चोरी करणाऱ्यांमध्ये रेल्वेचा गार्डही समील असल्याचं वास्तव उजेडात आलंय. रेल्वे गार्ड तेजस एक्सप्रेसच्या टॉयलेटमधील हॅन्डशॉवर चोरी करताना रेल्वेत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. ते सीसीटीव्ही फुटेज 'झी २४ तास'च्या हाती लागलंय.

मनोज भडंगे असं या गार्डचे नाव असून तो रेल्वे शटींगचं काम करतो. तेजस एक्सप्रेस रेल्वे यार्डमध्ये उभी असताना रेल्वेचे दरवाजे बंद करण्याचे काम हे या मनोज भंडंगेकडे करायचा... पण या कामासोबतच तो तेजस एक्स्पेसमधील हॅन्डशॉवर देखील चोरायचा, हे सीसीटीव्हीत दिसतंय. 

अशाच प्रकारे रेल्वेतील हेडफोनदेखील चोरीला गेले असण्याची शक्यता आहे... त्या दिशेने रेल्वे पोलीस तपास करत आहेत.