रॅकेट : नोकरीच्या नावाखाली परदेशात महिला वेश्या व्यवसायात

नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलले.

Updated: Oct 31, 2018, 12:01 AM IST
रॅकेट : नोकरीच्या नावाखाली परदेशात महिला वेश्या व्यवसायात title=

मुंबई : नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी फरीद उल हक शाह, कमाल अन्वर शेख आणि टिंकू राज यांना अटक करण्यात आली. 

भारतातून परदेशात तरूणींना पाठवण्यासाठी तिघांनी संपूर्ण यंत्रणाच तयार केली होती. सुरुवातील आग्रा राजस्थान उत्तरप्रदेश सारख्या राज्यातून गरजू मुलींना हेरलं जात असे. त्यानंतर त्यांना मुंबईला बोलावून त्यांची मुलाखत घेऊन ठराविक गोष्टींच्या आधारे किंमत ठरत असे. 

यानंतर या मुलींना नोकरी करण्यासाठी बहारिनसारख्या आखाती देशात नोकरीसाठी पाठवलं जात असे. मात्र परदेशात जाताच मुलींवर वेश्यावृत्ती करण्यासाठी जबरदस्ती करत आणि तसं न केल्यास पासपोर्ट जप्त करून डांबून ठेवलं जात असे. राजस्थानच्या एका तरुणीला अशाचप्रकारे डांबण्यात आलं होतं. शेवटी २ लाख रुपये मोजल्यानंतर तिची सुटका करण्यात आली.