Devendra fadnavis On Pune Bypoll: कसबा विधानसभा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) झी 24 तासला मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी कसब्याच्या निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
कसब्यातील ब्राम्हण मतदार नाराज? असा सवाल फडणवीसांना विचारला गेला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणतात, आम्हाला सुसंस्कृत राजकारण करतो आणि त्यावर आमचा भर असणार आहे. काही लोकं नाराज असू शकतात. कसब्यामध्ये ब्राम्हण उमेदवार दिलेत. पण सरसकट ब्राम्हण समाज नाराज नाही, असं मला वाटतं. ब्राम्हण समाज संकुचित विचारांचा नाही. भाजपचे पुण्याचे दोन खासदार आहेत. दोन्ही ब्राम्हण आहेत. पुण्यात ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व हे भाजपने दिलं. आमच्याकरिता जात हा विषय नाही.
आणखी वाचा - Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले 'हे' आदेश
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कोणाला जागा द्यावी, असा प्रश्न होता. त्यांचा मुलगा लहान होता. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्याला तिकीट दिलं. त्यामुळे वेगळा रंग दिला जातोय. जातीवादाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील फडणवीसांनी केला आहे.
Devendra Fadnavis LIVE | सध्याच्या राजकीय घडामोडींवर फडणवीस यांची EXCLUSIVE मुलाखत #Blackandwhite #DevendraFadnavis #Nileshkhare @khareviews https://t.co/nVPtIHClrS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 24, 2023
दरम्यान, आमचा विरोध व्यक्तीला नाही तर मानसिकतेला आहे. निवडणूक जिंकू किंवा हरू, त्याने फरक पडत नाही. पण ही मानसिकता संपली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
आम्ही राजकीय शत्रू नाही तर वैचारिक विरोधक आहोत. पण मविआ काळात मलाही टार्गेट करण्यात आलं, मला जेलमध्ये टाकण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल असे प्रयत्नही झाले आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.