Andheri by election : शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव, राजीनामा प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार!

Andheri By Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाच्या उमेदवार  ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यावर शिंदे गटाकडून ( Shinde group) दबाब आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Updated: Oct 12, 2022, 12:37 PM IST
Andheri by election : शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव, राजीनामा प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार! title=

मुंबई : Andheri By Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाच्या उमेदवार  ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यावर शिंदे गटाकडून ( Shinde group) दबाब आणण्यात येत असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

 ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न

अंधेरी पोटनिवडणूक ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. ऋतुजा लटके यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. सहा विभागांची एनओसी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनावर शिंदे सरकारचा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला जात नाही. आता या प्रकरणात शिवसेना कोर्टात जाणार आहे. राजीनामा मंजूर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार आहे. कोर्टांच्या निकालानंतर अर्जांची तारीख ठरणार आहोत, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप आहे.

महानगरपालिका आयुक्त सनधी अधिकारी आहेत. हे अधिकारी कायदा कानून मानून चालतात असं वाटतं होतं. इक्बाल चहल यांनी कोविड काळात यांच्या बरोबर काम केलं आणि त्यांना नाव मिळालं. इतकं होऊन ते आज ट्रीगर पॉईंटवर काम करत आहेत.   ऋतुजा लटके ठरवलं की आपल्या पतीच काम पुढे नेलं पाहिजे. पण बाळासाहेब यांच्या विचारांचा शिंदेसाहेब उल्लेख करत आहेत मग का तिची मुस्कटदाबी करत आहेत. तिची बांधिलकी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे.  ज्या अर्थी आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे तसाच त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे का?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. कोर्टाने तोंड फोडलं की महापालिका जागी होते. शिंदे फडणवीस सरकारला महापालिका घाबरत आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, आम्ही संयमाने जाणार आहोत. आमच्या कृतीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होणार याचं कारण आम्हाला बनायचं नाही. वेळ आली तर कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मुरजी पटेल अर्ज भरणार आहेत. मुरजी पटेल महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहे. त्यामुळे शिंदे गट आपला उमेदवार देण्याची शक्यता मावळली आहे.