Matoshree : 'मातोश्री'चा दरारा झाला कमी?

बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर ठाकरेंना भेटायला जायची.   

Updated: Jul 14, 2022, 11:26 PM IST
 Matoshree : 'मातोश्री'चा दरारा झाला कमी? title=

मुंबई :  बातमी राष्ट्रपतीपदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई दौऱ्याची. याआधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचा पाठिंबा मागितला होता. मात्र मुर्मू मातोश्रीवर गेल्याच नाहीत याची नेमकी काय कारणं आहेत, पाहूयात हा रिपोर्ट.  (presidential candidate draupadi murmu did not visit uddhav thackeray matoshri residence)

बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर ठाकरेंना भेटायला जायची. अगदी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार देखील. युपीएच्या  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते. 

यावेळी भाजपशी कट्टर हाडवैर असतानाही, शिवसेना खासदारांच्या दबावामुळं उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं मुर्मू देखील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जातील, अशी अपेक्षा होती. मात्र त्या न गेल्यामुळे मुर्मू-ठाकरेंची भेट टळली. अलिकडेच झालेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्त्व कमी झाल्याचं जाणवतंय. 

द्रौपदी मुर्मू यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची हॉटेल लीलामध्येच भेट घेतली. शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शनही केलं. मात्र मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणं टाळलं. यानिमित्तानं भाजपनं उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्त्व कमी झाल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे मातोश्रीचा दरारा कमी झाल्याचं दिसतंय.