दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत कोविडच्या कोरोना (COVID19) बाधीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.
पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लाँकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
या बैठकीत राज्यात पुढील पूर्ण आठवडा लावून लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
उद्याच्या बैठकीत मागील वर्षी जसा कडक लॉकडाऊन होता तसा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं. तसा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते, भाजपचे नेते त्याचबरोबर मनसे, रिपाई, समाजवादी पक्ष यासह सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.
राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. दुसरीकडे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे, बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकार आता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे.
सध्या राज्यातील कोरोना संदर्भातील नियम अधित कठोर करण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री पासून रविवारपर्यंत कठोर लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 नंतर संचारबंदीचा नियम कठोरपणे पाळला जातोय. त्याआधीच दुकानं, कार्यालय बंद करण्यास सांगितलं जातं आहे. त्यामुळे कडक नियमांच्या आड लॉकडाऊनची तयारी सुरु आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडलाय. उद्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.