Big News : उद्धव ठाकरेंसोबत महायुती चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात आहे तरी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयात बैठक सुरु आहे. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 

Updated: Dec 13, 2022, 05:43 PM IST
Big News : उद्धव ठाकरेंसोबत महायुती चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट;  प्रकाश आंबेडकर यांच्या मनात आहे तरी काय? title=

Maharashtra Politics :  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी घडामोड पहयाला मिळाली आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीची चर्चा सुरु आहे.  युतीची चर्चा निर्णयाक टप्प्यावर पोहचली असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयात बैठक सुरु आहे. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत ही महत्वपूर्ण बैठक असल्याचे समजते. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात ही बैठक बोलावली असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे.  दादरच्या आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत आक्षेप अनेकांनी घेतला होता. या अनुषंगाने काही बदल करण्याविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे समजते.