मुबई: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संत आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या विधानावर भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलीय. संघाचा मनू विचार जनतेने नाकारल्यामुळे संत विचाराकडे यावे लागले असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवाय, आपण मनू आणि संत यांचे विचार भिन्न असल्याचे पटवून देऊ शकतो यासाठी आंबेडकर यांनी खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची तुलना थेट संतांशी केली होती. त्यामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांचंही काम सारखंच असल्याचं भागवत यांनी म्हटलं होतं.. रत्नागिरीतल्या नाणीज इथं मोहन भागवत यांचा नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीनं राष्ट्रीय संघाचा गौरव करण्यात आला, त्यावेळी भागवत बोलत होते.
संघ मोठी शक्ती झाल्यानंच आज संघाची देश विदेशात चर्चा सुरू आहे. ही शक्ती ज्याला अनुकूल नाही ते संघावर टीका करत असल्याचे मोहन भागवत यांनी या वेळी म्हटलं होतं.