महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या शक्यतेने, मध्य रेल्वेची मोठी घोषणा

 रेल्वेने एप्रिल महिन्याच्या अखेरीसपर्यंत 106 स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे

Updated: Apr 13, 2021, 04:05 PM IST
महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या शक्यतेने, मध्य रेल्वेची मोठी घोषणा title=

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वनेही मोठी घोषणा केली आहे. रेल्वेने एप्रिल महिन्याच्या अखेरीसपर्यंत 106 स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. यात राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर ते उत्तर भारतातील शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रेन्सचा सामावेश आहे. यासोबतच रेल्वेने गरज पडल्यास ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

डुप्लीकेट ट्रेन चालवणार

रेल्वेने फक्त कनफर्म टिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु प्रवाशांची संख्या वाढल्यास डुप्लीकेट ट्रेन चालवण्यात येऊ शकते. सोमवारी मुंबई ते गोरखपूर दरम्यान मध्य रेल्वेने डुप्लीकेट ट्रेन चालवली होती.

संपूर्ण लॉकडाऊनच्या शक्यतेने स्टेशनवर गर्दी

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, सरकारक़डून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी क़डक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तापित मजूरांनी आपआपल्या गावी जाण्यास स्टेशन्सवर गर्दी केली आहे.