मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) दररोज नवनवे खुलासे येत आहे. शनिवारी मुंबई क्राइम ब्रांचने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज आणि JL स्ट्रीमच्या अंधेरी ऑफिसमध्ये पुन्हा एकदा छापा मारला. येथे त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. (Pornography case mumbai crime branch found hidden cupboard in Raj Kundras Andheri office)
मुंबई क्राइम ब्रांचला राज कुंद्रा (Raj Kundra) चं एक लपवलेलं कपाट मिळालं आहे. यामध्ये क्राइम ब्रांचला खूप बॉक्स आणि फाइल्स मिळाल्या आहेत. क्राइम ब्रांचच्या सुत्रांचं म्हणणं आहे की,'यामध्ये क्रिप्टो करन्सीसंबंधित अनेक माहिती आहे.'
या अगोदर क्राइम ब्रांचने 19 जुलै रोजी राज कुंद्राच्या ऑफिसवर छापा मारला होता. मात्र तेव्हा हे लपवलेलं कपाट सापडलं नाही. मात्र शनिवारी पुन्हा क्राइम ब्रांचने छापा मारला. कारण काही लोकांशी चौकशी केल्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला. ज्यांच्यामुळे या लपवलेल्या कपटाचा खुलासा झाला आहे.
मुंबई क्राइम ब्रांच मरक्युरी इंटरनॅशनल कंपनीचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या अकाऊंटमध्ये मरक्युरी इंटरनॅशनलमधून पैसे आले आहेत. कंपनीच्या आफ्रिकी बँकेच्या अकाऊंटमधून है पैसे ट्रान्सफर झाले आहेत. मरक्यूरी इंटरनॅशनल ऑनलाइन जुगार खेळण्याचं काम करते. पोलिसांना असा संशय आहे की, पॉर्नोग्राफीतला पैसा यामध्ये लावण्यात आला आहे.
या अगोदर शुक्रवारी क्राइम ब्रांचच्या टीमने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावरही छापा मारला. यासोबतच क्राइम ब्रांचने पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा जबाबही नोंदवला आहे. या चौकशी दरम्यान शिल्पाला अनेकदा अश्रू अनावर झाले. क्राइम ब्रांचच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण स्टेटमेंटच्या दरम्यान शिल्पा शेट्टी 3 ते 4 वेळा रडली. शिल्पा शेट्टीने देखील क्राइम ब्रांचला सवाल केला की,'राज कुंद्राने असं पॉर्नोग्राफीचं काम केलं आहे?'
या दरम्यान शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ने क्राइम ब्रांचला सांगितलं की,'या सगळ्या प्रकरणामुळे तिच्या इमेजल धक्का बसला आहे. त्यांच्या हातातून अनेक ब्रँड्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स देखील निघून गेले आहेत. या चौकशी दरम्यान क्राइम ब्रांचने वियान इंडस्ट्रीजच्या पार्टनशीपवरही प्रश्न विचारण्यात आले.' या दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 2 ते 3 वेळा चौकशी झाली.