भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आज शिवाजी पार्कावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अनेक दिग्गज नेते या वेळी उपस्थित राहणार आहे.

Updated: Feb 6, 2022, 03:52 PM IST
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचणार title=

मुंबई : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी लढा देताना निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे. लता मंगेशकर यांचे पार्थिव घरी पोहोचले आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Last Journey of Lata Mangeshkar)

सुरांची राणी लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) मुंबईत दाखल येत आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (CM Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक दिग्गज नेते देखील शिवाजी पार्कवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC Commissioner) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी म्हटले आहे की, 'आजचा दिवस अतिशय दुःखाचा आहे. लताजींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुपारी 3.30 वाजता त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर येणार असून अखेरचे दर्शन जनतेसाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5:45 वाजता येतील आणि लताजींच्या पार्थिवावर संध्याकाळी 6:30 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.'