कुणामुळे मुख्यमंत्र्यांचा तो अपघात... अहवालात झालं उघड

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं तपास अहवाल नमूद करण्यात आलंय.

Updated: Jun 16, 2017, 01:14 PM IST
कुणामुळे मुख्यमंत्र्यांचा तो अपघात... अहवालात झालं उघड title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं तपास अहवाल नमूद करण्यात आलंय.

लातूर जिल्ह्यातील निलंगा मध्ये २५ मे रोजी ही दुर्घटना घडली होती. त्यात मुख्यमंत्री सुदैवाने थोडक्यात बचावले होते. 

हा अपघात हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार घेतल्यानं तसंच निर्धारीत सुरक्षा नियमांचं पालन न केल्यानं झाल्याचं 'एअरक्राफ्ट अॅक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'नं म्हटलंय.

हेलिपॅडजवळचे विद्युत खांब आणि तारांची काळजी पायलटने घेणे अपेक्षित असते. तसेच लातुरच्या उष्ण हवामानात हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी क्षमतेपेक्षा कमी भार घेणे आवश्यक असतानाही त्याची काळजी पायलटनं घेतली नाही, असंही अहवालात नमूद करण्यात आलंय.