मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात पुन्हा अडचणी येऊ लागल्या आहेत. दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागी हे स्मारक उभारले जाणार आहे. पण सुरूवाती पासूनच हे स्मारक कायद्याच्या कचाट्यात अडकत आहेत. या ठिकामी स्मारक उभारण्यासाठी पर्यावरण रक्षण कायद्यासह अन्य कायद्यांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. एवढं सीआरझेडचे नियम, हरित क्षेत्राचे नियम, हेरिटेज इमारतीविषयीचे नियमही धाब्यावर बसवण्यात आले आहेत', असा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
जागेच्या वापरात बदल केला आहे. सागरी किनारा कायद्यानुसार ही जागा ग्रीन झोन मध्ये आहे. तसेच यानुसार कोणतेही हेरीटेज स्ट्रक्चर पाडता येऊ शकत नाही असे अॅड. वाय.पी. सिंग यांनी 'झी 24 तास' ला सांगितले. कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायचे असल्याचे तसे लेखी देणेही आवश्यक आहे. पण याबाबतीत ते ही न झाल्याचे समोर आले आहे.
महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक करायला विरोध करणारी याचिका जनमुक्ती मोर्चा आणि भगवानजी रायानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करा, अशी मागणी राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती.