मोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे.  मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 20, 2018, 04:19 PM IST
 मोठी खुशखबर :  पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव  title=

नवी दिल्ली :  पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे.  मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. 

काय आहे पेट्रोलचा भाव 

पेट्रोलचा दर २० फेब्रुवारीला मुंबईत ७९ रुपये ६१ पैसे आहे तर डिझेलचा दर प्रतिलीटर  ६६ रुपये ३४ पैसे आहे.  पेट्रोल १९ पैसे तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. 

पेट्रोलच्या किंमती किती झाल्या कमी

पेट्रोलबाबतीत बोलायचे झाले तर १० फेब्रुवारीला दर प्रतिलीटर ८१ रुपये आणि १९ पैसे होते. यात गेल्या दहा दिवसात सातत्याने घट होत आहे.  
११ फेब्रुवारी - ८१.०८
१२ फेब्रुवारी - ८०.८७
१३ फेब्रुवारी - ८०.८१
१४ फेब्रुवारी - ८०.८१
१५ फेब्रुवारी - ८०.६६
१६ फेब्रुवारी - ८०.३९
१७ फेब्रुवारी - ८०.१०
१८ फेब्रुवारी - ७९.९४
१९ फेब्रुवारी - ७९.८०
२० फेब्रुवारी - ७९.६१

 

डिझेलच्या किंमती झाल्या इतक्या कमी 

डिझेलच्या बाबतीत बोलायचे झाले तर १० फेब्रुवारीला दर प्रतिलीटर ६८ रुपये आणि २१ पैसे होते. यात गेल्या दहा दिवसात सातत्याने घट होत आहे.  
११ फेब्रुवारी - ६८.०५
१२ फेब्रुवारी - ६७.७५
१३ फेब्रुवारी - ६७.६२
१४ फेब्रुवारी - ६७.६२
१५ फेब्रुवारी - ६७.४३
१६ फेब्रुवारी - ६७.११
१७ फेब्रुवारी - ६६.८४
१८ फेब्रुवारी - ६६.६२
१९ फेब्रुवारी - ६६.५०
२० फेब्रुवारी - ६६.३४