बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका

 बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयाची नोटीस

Updated: Jan 24, 2019, 05:04 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. स्मारक समितीचं कोणतही कार्यालय नसल्याचा याचिकाकरत्यांनी दावा करत याचिका दाखल केली आहे. याबाबतीत राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बुधवारीच स्मारकाचे गणेशपूजन झालं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे कुटुंब स्मारकस्थळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त स्मारकाचं काम सुरु झालं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. याबाबतीत 'एमएमआरडीए'कडे याची संपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला होता. पण आता या स्मारका विरोधात याचिका दाखल झाल्याने स्मारकाच्या कामाला आणखी विलंब होण्य़ाची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप कागदोपत्रीच आहे. त्यात आता पुन्हा याचिका दाखल झाल्याने स्मारकांच्या कामाला विलंब होणार आहे.