चिंताजनक : धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, एकाचा मृत्यू

धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येत आहे.  

Updated: May 12, 2020, 07:57 PM IST
चिंताजनक : धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, एकाचा मृत्यू title=

मुंबई: धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येत आहे. आज याठिकाणी ६३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही मुंबईकरांसाठी अत्यंत  चिंतेची बाब आहे. यात धारावीतील ४६, माहीममधील ६ आणि दादरमधील ११ नव्या रुग्णांचा समावेश आहे. शिवाय धारावीत कोरोना व्हायरसने एकाचा बळी देखील घेतला आहे. कोरोना रुग्णांची सतत होणारी वाढ पाहता मुंबईत लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

धारावीत आज ४६ नवे रूग्ण आढळले असून एकचा मृत्यू झाला आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ९६२ वर गेली असून एकूण ३१ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. रविवारी ही संख्या ९१६ वर पोहोचली होती. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे ही साखळी तोडावी तरी कशी असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. 

त्याचप्रमाणे दादरमध्ये देखील कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले असून एकचा मृत्यू झाला आहे. दादरमधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या १२५ वर पोहोचली आहे.  शिवाय एकूण ७ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

माहीम येथे सहा रुग्ण सापडल्याने माहीममधील करोना रुग्णांची संख्या १४३ झाली असून मृतांचा आकडा ७ झाला आहे. माहीममधील २८ करोना रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.