मुंबई : जर तुम्ही पक्षी प्रेमी आहात तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईत कबुतरांच्या विष्ठेमुळे चक्क दोन महिलांना फुफ्फुसाचे आजार झालेत. एकीला तर थेट लंग ट्रान्सप्लांट करावं लागलं. तुमच्या भोवती जर पक्षांची विष्ठा असेल तर सावधानता बाळगा. कबुतरांच्या विष्ठेमुळे हेमाली शहा या ३८ वर्षीय महिलेला लंग ट्रान्सप्लांट करावं लागलं.
परिसरात कबुतरांच्या वावर अधिक असल्यामुळे हेमाली शाह यांनी त्यांचं घर देखील बदललं. पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि अखेर त्यांना लंग ट्रान्सप्लांट करावं लागलं.
देशात ४७ टक्के फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण आहेत. त्यातल्या १३ टक्के लोकांना कबुतरांमुळे रोग होतात. कबूतरांना दाणे घालताना या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि मगच दाणे घालण्याचा सल्ला डॉक्टर संदीप अत्तवार यांनी दिला आहे.
शहरात कबुतरांमुळे अनेकांना त्रास होत आहे. दादर, गिरगाव, मलबार हिल, गोरोगाव, बोरीवली या ठिकाणी अधिक पक्षी आहेत. त्यामुळे त्यांना दाणे देण्यासाठी नागरिक येथे येत असतात. रस्त्यावरून ये-जा करणारे कायम पक्ष्यांना दाणे देत असतात पण त्यामुळे तेथील नागरिकांना या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे.