मुंबई : किल्ले रायगडसह महाराष्ट्रातील १० किल्ल्यांच्या विकासाबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंशी चर्चा केली. या १० किल्ल्यांचं संवर्धन करून, ते जगाच्या पर्यटन नकाशावर यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. या १० किल्ल्यांमध्ये पन्हाळा, सिंधुदुर्ग, सोलापूर भुईकोट किल्ला, शिवनेरी आदी किल्ल्यांचाही समावेश आहे.
आज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, श्री आदित्य ठाकरे @AUThackeray यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन याविषयी चर्चा केली. pic.twitter.com/JMKJcN4igd
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 20, 2020
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं की, 'पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जगाच्या नकाशावर हे किल्ले कसे आणता येतील याबाबत चर्चा झाली. मला आनंद झाला की, बऱ्य़ाच दिवसांनी ज्यांना पर्यटन समजतं असे पर्यटन मंत्री आणि एक स्पार्क मला आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसला. हे खरोखर कौतुकास्पद आहे.'