पवार कुटूंब अमिताभ गुप्ता यांचे बोलविता धनी - किरीट सोमय्यांचा आरोप

डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी वाधवान व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी राज्याचं राजकारण तापलं आहे.

Updated: Apr 10, 2020, 01:42 PM IST
पवार कुटूंब अमिताभ गुप्ता यांचे बोलविता धनी - किरीट सोमय्यांचा आरोप title=

मुंबई : डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी वाधवान व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्याचे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आरोपींना लॉकडाउन दरम्यान मुंबईहून महाबळेश्वरला प्रवास करू दिल्याप्रकरणी, अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

तर अमिताभ गुप्ता हे पवारांचे बोलविता धनी आहेत, तसेच पवार कुटंबीय आणि वाधवान यांचे कुटूंबीय - दिवान बिल्डर्सचे संबंध चांगले आहेत, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही किरिट सोमय्या यांनी झी २४ तासशी बोलताना केले आहेत.

या प्रकरणात अमिताभ गुप्ता यांना अटक करावी आणि चौकशी करावी, यानंतर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हे समोर येईल, असं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाधवान कुटूंबियांच्या ५ गाड्या आणि २३ जणांना सध्या क्वोरोंटाईन करण्यात आलं आहे. दुसरीकडे हा आरोप बिनबुडाचा आहे,

राज्य सरकार आपल्याकडून या प्रकरणी कारवाई करत आहे. तर चौकशी करायचीच असेल तर ती केंद्राने करावी, आणि आरोप करणारे किरिट सोमय्या हे बेजाबदार वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, यामुळेच त्यांच्या पक्षाने त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारलं होतं, म्हणून किरिट सोमय्या यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.