मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या ७ पैकी ५ रूग्णांची दृष्टी गेली

जोगेश्वरी येथील महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमधला भोंगळ कारभार समोर आला आहे.

Updated: Jan 25, 2019, 06:28 PM IST
मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या ७ पैकी ५ रूग्णांची दृष्टी गेली title=

मुंबई : जोगेश्वरी येथील महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमधला भोंगळ कारभार समोर आला आहे. इथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या ७ पैकी ५ रूग्णांची दृष्टी गेली. जंतुसंसर्ग झाल्यानं या रूग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप भाजप नगरसेवक अभिजीत सावंत यांनी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीत केला. ४ जानेवारीला ही शस्त्रक्रिया झाली होती. जंतुसंसर्ग झाल्यानंतर सर्व रूग्णांना ६ जानेवारीला केईएम रूग्णालयात दाखल केलं गेलं. तरीही या रुग्णांची दृष्टी वाचवण्यात यश आलं नाही. ऑपरेशन थियटर रोज साफ करण्याची गरज असताना, बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर दोन आठवड्यांनी साफ केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.