निसर्ग चक्रीवादळ : हवाई वाहतुकीवरही परिणाम; मुंबईतील अनेक उड्डाणं रद्द

पाहा नेमकी किती उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत   

Updated: Jun 3, 2020, 03:15 PM IST
निसर्ग चक्रीवादळ : हवाई वाहतुकीवरही परिणाम; मुंबईतील अनेक उड्डाणं रद्द  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आव्हानं आणि संकटांचं सावट घेऊन मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या Cyclone Nisarga निसर्ग या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बबातीत सावधगिरी पाळण्यात येत आहे. चक्रीवादळाचं एकंदर गंभीर स्वरुप पाहता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच धर्तीवर सावधगिरी म्हणून विमान वाहतुकीतही काही अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. 

कोरोना व्हायरसमुळं सुरु असणाऱ्या लॉकडाऊनदरम्यान आणि गर्दी टाळण्यासाठी म्हणून ठराविक प्रमाणातच सशर्त विमानवाहतुकीस प्रशासनानं परवानगी दिली होती. पण, आता मात्र या निर्धारित उड्डाणांमध्येही कपात करण्यात आली आहे. 

CycloneNisarg : चक्रीवादळादम्यान प्रवास करताय, हे नक्की वाचा

मुंबई आणि परिसरावर घोंगावणारं निसर्ग चक्रीवादळ पाहता मुंबईतील अनेक उड्डाणं रद्द सरकण्यात आली आहेत. सद्यस्थितीला मुंबईतून ५० उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. पण, वादळाच्या पार्श्वभूमीवर आता ५० पैकी फक्त १९ उड्डाणंच काळात झेपावणार आहेत. ज्यामध्ये ८ विमानं ही अरायव्हल असतील तर, ११ उड्डाणं डिपार्चर असतील अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ

 

 

चक्रीवादळाचं संकट पाहता विमान वाहतुक कंपन्यांकडून घेण्यात आलेला हा निर्णय पाहता यादरम्यानच्या काळात प्रवाशांना घरीच थांबण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुमच्यापैकी कुणी विमानप्रवासाला निघण्यासाठीचा बेत आखून त्या रोखाने निघत असेल तर, उड्डाणाबाबतची निश्चितता नक्की करुन घ्या.