परखड बाबासाहेब २ | 'मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता' या आक्षेपाला बाबासाहेबांचा या शब्दात विरोध

विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा...   

Updated: Apr 14, 2022, 09:25 PM IST
परखड बाबासाहेब २ | 'मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता' या आक्षेपाला बाबासाहेबांचा या शब्दात विरोध title=

मुंबई : भाषावार प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालीन विचारवंतांनी (विशेषतः प्रोफेसर सी. एन. वकील, प्रा. दातवाला आणि प्रा. घीवाला यांनी) केला होता. यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.

- आक्षेप : 'मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता'

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर खाली वाचा :

"मराठयांनी मुंबईला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनविण्याची पर्वा केली नाही, ही बाब भौगोलिकतेपासून काढलेल्या निष्कर्षाच्या वैधतेवर कोणताही परिणाम करीत नाही. मराठयांनी मुंबई जिंकून घेण्याविषयी गांभीर्य दाखविले नाही यावरुन मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असे सिद्ध होत नाही. याचा अर्थ एवढाच होतो की, मराठेशाही ही भूमीवरील सत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे बळ बंदर जिंकून घेण्यासाठी वापरले नाही."

(संदर्भ : महाराष्ट्र : एक भाषिक राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन).