बहुचर्चित 'पॅडमॅन' सिनेमा आज प्रदर्शित

या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2018, 01:50 PM IST
बहुचर्चित 'पॅडमॅन' सिनेमा आज प्रदर्शित title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांचा बहुचर्चित 'पॅडमॅन' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.

अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या जीवनावर आधारित

अभिनेत्री ट्विंकल खन्नाची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन आर.बाल्कींनी केलं आहे. खेड्यातल्या स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूरच्या अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आधारित आहे. 

पॅडमॅनचा व्यवसाय १०० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता

हा सिनेमा वीकेंडपर्यंत 100 कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पॅडमॅन हा सिनेमा सॅनेटरी नॅपकीनकडे पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन बदलू शकेल, असंही म्हटलं जात आहे, पॅडमॅन हा सिनेमा सामाजिक विषयावर आधारीत सिनेमा सारखाच आहे.