मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हॉलिवूडच्या 'पायरेटस् ऑफ कॅरेबियन' या चित्रपटाच्या पोस्टरचे मॉर्फिंग करुन त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चेहरे लावण्यात आले होते. त्याखाली ठग्ज ऑफ महाराष्ट्र. ठगबाजीची चार वर्षे, असे कॅप्शनही लिहण्यात आले होते. या माध्यमातून विरोधकांनी सरकारच्या अकार्यक्षम कारभारावर निशाणा साधला.
तत्पूर्वी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधकांनी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा केली. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून दुष्काळाची मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण, दुष्काळ, जलयुक्त शिवार योजनेतील कथित गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफीतील गोंधळ इत्यादी प्रश्नांवर सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते आदरणीय कॉम्रेड माधवराव गायकवाड साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हायला हवा होता. त्यांना तसा इतमाम दिला गेला नाही यासाठी मी सरकारचा धिक्कार करतो.
- @dhananjay_munde pic.twitter.com/umPBP5g5RD— NCP (@NCPspeaks) November 18, 2018
70 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आरक्षणाचे मुद्दे ऐरणीवर व प्रलंबित आहेत. हिवाळी अधिवेशन कमीतकमी 3 आठवड्यांचं हवं. सरकारकडे राज्याच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. पळपुटेपणा करत सरकारने अधिवेशनाचा कार्यकाल कमी केला आहे.
- @dhananjay_munde pic.twitter.com/F5vDQg81WM— NCP (@NCPspeaks) November 18, 2018