नवी मुंबई: राज्यभरात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. नवी मुंबईत कांद्याची आवक ३० टक्क्यांनी घटलीय. १५ दिवसांपूर्वी बाजारसमितीत ८० ते ९० गाड्यांची आवक होत होती. मात्र, सध्या केवळ ५०-६० गाड्यांची आवक होतेय. त्यामुळे कांद्याचे दर आठ ते दहा रुपयांनी वाढले आहेत.
एकीकडे यामुळे ग्राहक चिंतेत पडले असताना बळीराजाला मात्र वाढलेल्या दरांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे कांदा उत्पादकांचा जुना कांदा सडण्याच्या मार्गावर आहे. तर पावसाअभावी नव्या का्द्याचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काळात कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.