कसाबची ओळख पटवणारे श्रीवर्धनकर आजोबा जगतायत 'या' स्थितीत

आताही त्यांनी वृद्धश्रमात जावे अशी परिवाराची इच्छा आहे. 

Updated: May 6, 2020, 05:06 PM IST
कसाबची ओळख पटवणारे श्रीवर्धनकर आजोबा जगतायत 'या' स्थितीत title=

मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात क्रूरकर्मा अजमल कसाबची ओळख पटवणे हे महत्वाचे काम होते. ही कामगिरी हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांनी केली होती. पण सध्या ७० वर्षांचे असलेल्या हरिश्चंद्र यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. परिवाराने त्यांची साथ सोडली आहे. म्हातारपणात खाण्याची सोय नाही, डोक्यावर छप्पर नाही अशा दयनीय अवस्थेतून ते जात आहेत. 

हरिश्चंद्र यांचा परिवार त्यांना संभाळत नाही. ते बेवारसपण रस्त्यावर फिरत आहेत. त्यांनी कित्येक दिवस काही खाल्लं देखील नाही. एका दुकानदाराने पोलिसांच्या मदतीने हरिश्चंद्र यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. पण आताही त्यांनी वृद्धश्रमात जावे अशी परिवाराची इच्छा आहे. 

एका दुकानाचे मालक डीन डिसूजा यांनी हरिश्चंद्र यांना रस्त्यावर पाहीले. त्यांना त्यांची दया आली. बेवारस वृदधांसाठी आश्रम चालवणाऱ्या संस्थेशी डिसूजा यांनी संपर्क केला. त्यांना आंघोळ घातली, खायला दिले आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

हरिश्चंद्र यांचे वय झाले आहे. ते खूप घाबरले होते. थरथरत ते काही शब्दच बोलू शकले. आपला भाऊ पालिकेत नोकरी करतो असे त्यांनी सांगितले. डिसूजा आणि त्यांच्या मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पालिकेत फेऱ्या मारुन त्यांच्या भावाची भेट घेतली. 

आग्रीपाडा पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान स्पेशल पास जारी करुन हरिश्चंद्र यांच्या मुलाला बोलावून घेतले. मुलगा कल्याणहून तिथे पोहोचला. पण वडीलांना घरी नेण्यास तयार नव्हता. एनजीओने त्यांना वृद्धाश्रमात ठेवावं अशी इच्छा त्याने बोलून दाखवली.