सत्तासंघर्षाच्या राजकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची गोची; मंत्रालयीन कामातून अचानक दांड्या

 शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात अंदाधुंद निर्णयांची प्रक्रिया सुरू असून, राज्यपालांनी राज्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा असे भाजपने  राज्यपालांना पत्र दिले आहे.

Updated: Jun 24, 2022, 02:39 PM IST
सत्तासंघर्षाच्या राजकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची गोची; मंत्रालयीन कामातून अचानक दांड्या title=

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात अंदाधुंद निर्णयांची प्रक्रिया सुरू असून, राज्यपालांनी राज्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा असे भाजपने  राज्यपालांना पत्र दिले आहे. तर मंत्र्यांकडून सह्या करण्यासाठी तगादा वाढल्यानं बहुतांश अधिकारी रजेवर गेले आहेत

मंत्रालयातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अचानक सुट्टीवर गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. परंतू सरकार पडण्याआधी मंत्रालयातील मंत्र्यांकडून असंख्य निर्णय पारीत करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव वाढला आहे. 
  
सत्ता जाता जाता शेवटच्या टप्प्यात मंजूरीसाठी आलेली कामे उरकण्याकडे मंत्र्यांचा कल वाढला आहे. यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. त्यात नविन सरकार आल्यास आपण अडचणीत सापडू नये म्हणून अधिकारी घाईघाईत सही करण्यास टाळाटाळ करीत आहे. 

मंत्रालयातील अनेक उपसचिव, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव दोन दिवसांपासून सुट्टीवर आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी देखील सुट्टीवर आहेत.