​'मोनोरेल' मुंबईकरांची नावडती!

म्हैसूर कॉलनी स्थानक इथे मोनो च्या डब्याला आग लागली आणि... 

Updated: Sep 21, 2018, 03:18 PM IST
​'मोनोरेल' मुंबईकरांची नावडती! title=

मुंबई : मुंबईत कधीच लोकप्रिय न ठरलेल्या मोनो रेलेच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होतेय. सध्या चेंबूर ते वडाळा दरम्यान सुरू असलेल्या मोनोची प्रवासी संख्या अवघ्या १० हजारांवर आलीय. जवळपास ९ महिने बंद असलेली मोनो रेले सेवा नुकतीच पुन्हा सुरू करण्यात आली. सेवा बंद होण्यापूर्वी दररोज सुमारे १५ हजार प्रवासी मोनोचा वापर करत. पण आता त्यात मोठी घट झालीय.  

उल्लेखनीय म्हणजे, म्हैसूर कॉलनी स्थानक इथे मोनो च्या डब्याला आग लागली आणि त्यानंतर नऊ महिने विश्रांती घेतल्यानंतर याच महिन्यात 1 सप्टेंबरपासून मोनो पुन्हा एकदा सुरू झाली. वडाळा ते सात रस्ता हा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.