मुंबई : पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे एकाने पोलीस निरीक्षकांच्या दालनाबाहेर आत्मदहन केल्याची घटना मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. रिजवान अब्दुल हमीद जमादार हा बैंगनवाडीचा राहणारा आहे. तो रिक्षा पार्किंगचं काम करतो.
आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत असल्याची त्याची तक्रार होती. मात्र पोलिस तक्रार लिहून घेत नसल्यानं आज दुपारी दोनच्या सुमारास त्यानं पोलीस ठाण्यातच स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतले. पोलिसांनी तातडीनं आग विझवली. मात्र तोपर्यंत तो ५५ टक्के भाजला होता. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.