नोव्हेंबर सुरू झाला पाळा 'नो शेव्ह नोव्हेंबर'

 या ट्रेन्डमागे पुरूषांचे आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सरबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे.

Updated: Nov 3, 2017, 07:09 PM IST
नोव्हेंबर सुरू झाला पाळा 'नो शेव्ह नोव्हेंबर' title=

मुंबई : 'नो शेव्ह नोव्हेंबर' अशी एक मोहिम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात येते, या वर्षीही ही मोहिम काही तरूणांनी काढली आहे. या ट्रेन्डमागे पुरूषांचे आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सरबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे.

ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी १९९९ साली, कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. महिन्याभरात दाढी करण्यासाठी जेवढे पैसे खर्च होतात, तेवढे पेसे कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे, हा मागील उद्देश आहे.

यात देखील कॅन्सरग्रस्त पुरूषांच्या उपचारासाठी लागणारे पैसे जमवले जातात. हा प्रयत्न नोव्हेंबर २००४ पासून सुरू आहे.  या मोहिमेने कॅन्सरच्या रुग्णांबरोबरच पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांवरही काम सुरू केलं, या मोहिमेसंदर्भातील सर्व माहिती no-shave.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

इंटरनेटमुळे फॅशन ट्रेण्ड म्हणून 'नो शेव नोव्हेंबर' साजरा करणाऱ्यांची संख्या वाढलीय, अनेकांना याचा खरा उद्देश ठाऊक नसला तरी.