रमेश कदमना दिलासा नाहीच

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. 

Updated: Aug 2, 2017, 07:23 PM IST
रमेश कदमना दिलासा नाहीच  title=

मुंबई : अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय.

मला विधानसभा अधिवेशनात सहभागी व्हायचंय, अधिवेशनात मंजूला शेट्ये प्रकरणी अनेक खुलासे करायचे आहेत. किमान मुख्यमंत्र्यांना तरी भेटू द्या अशा तीन मागण्या रमेश कदम यांनी अर्जाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केल्या होत्या. पण, तुमच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. तुम्ही अटकेत आहात त्यामुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही असं स्पष्ट करत रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणाका दिलाय.