मुंबई : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या आकड्याने धडकी भरवली आहे. मुंबईत कोरोनाची (corona) दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारापर्यंत गेली तर लॉकडाऊनचा विचार करावा लागले, असं मुंबईच्या महापौरा किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटलं होतं. गुरुवारी मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर बोलताना आज महापौरांनी मिनी लॉकडाऊनचे (Mini Lockdown) संकेत दिले आहेत. आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण मुंबईकरांनी काळजी घ्यावी, काही नागरिक बेफिकिरपणे वागतात. मुंबईतल्या नागरिकांनी घाबरुन जाण्यापेक्षा गांभीर्याने विचार करायला हवाय असं महापौरांनी म्हटलं आहे. (mini lockdown in mumbai warning from mayor kishori pedankar)
मुंबईत पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर रुग्णांसाठी २२ हजार बेड्स राखीव ठेवले आहेत. मात्र सध्या बाधित रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. सध्या रुग्णालायत १ हजार १७० रुग्ण दाखल आहेत, संपूर्ण लॉकडाऊन सध्या तरी होणार नाही, पण जर काही बेफिकिर नागरिकांमुळे रुग्ण संख्या वाढत राहिली तर काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतील असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे.
आज ७ वाजेपर्यंत निर्णय होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि शरत पवार याबाबतचा निर्णय घेतील. मुंबईतील निर्बंधाबाबत आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय जाहीर होऊ शकतो असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन लावणं परवडणार आहे, असं महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
तर मार्शलची गरज लागणार नाही
लोकांनी नियम पाळले तर मार्शलची गरज लागणार नाही, पण लोकं नियम पाळत नाहीत, म्हणून मार्शल नेमावे लागतात, त्यामुळे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.