चर्चांना उधाण...नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद

काय आहे या भेटी मागचं कारण?  

Updated: Jan 7, 2021, 03:59 PM IST
चर्चांना उधाण...नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद  title=

मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आशीर्वाद घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या नितीन गडकरी हे एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा आशीर्वाद घेतला. शिवाय त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पाही मारल्या.

त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नितीन गडकरी आणि मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. 

 

तर दुसरीकडे ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे.सांगायचं झालं तर नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलं होतं. 

1995 साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. मनोहर जोशी यांच्याकडं या सरकारचं नेतृत्व होतं. 1995 ते 1999 सालपर्यंत नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली होती.