गडकरींचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा आहेर...

   जे अनेक वर्ष विरोधी पक्षात असतात ते सत्तेत गेले तरी विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्वपक्षीय नेत्यांना लगावला. 

Updated: Oct 27, 2017, 07:00 PM IST
 गडकरींचा स्वपक्षातील नेत्यांना घरचा आहेर... title=

दीपक भातुसे, झी मीडिया,  मुंबई :   जे अनेक वर्ष विरोधी पक्षात असतात ते सत्तेत गेले तरी विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्वपक्षीय नेत्यांना लगावला. 

 विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर दिसून आलेत. 

एकसष्टी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्य मंत्री रामदास आठवले, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित लावली आहे. 

या वेळी आपल्या रोखठोक शैलीत बोलताना गडकरी म्हणाले,  ज्यांचा उदय असतो त्याचा अस्त होत असतो,  जे सत्तेत असतात ते कधी तरी विरोधी पक्षात जातात आणि जे विरोधात असतात ते कधी तरी सत्तेवर येतातच, जे अनेक वर्ष विरोधी पक्षात असतात ते सत्तेत गेले तरी विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात. असा घरचा आहेर गडकरींनी स्वपक्षातील नेत्यांना दिला. 

एका गडकरींचे संपूर्ण भाषण जसंच्या तसं... (वरील वक्तव्य ८.१५ मिनिटांनंतर आहे) 

 

 

गडकरी यावरच थांबले नाही. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते त्यांना उद्देशून म्हटले की मी रावतेंबद्दल बोलत नाही, आमच्या भाजपामध्येही असे लोक आहेत. यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 

काय करणार आम्ही एवढी आंदोलन केली, एवढा विरोध केला त्याची सवय झाली आहे. आमच्याकडच्या लोकांना अजून सत्ता बोचते,  ते जुने दिवस आठवतात असा उपरोधिक टोलाही गडकरींनी लगावला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.