फडणवीसांना ठाकरे सरकारचा दणका, नीराचे पाणी पुन्हा बारामतीला

नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: Feb 19, 2020, 11:30 PM IST
फडणवीसांना ठाकरे सरकारचा दणका, नीराचे पाणी पुन्हा बारामतीला  title=

मुंबई : नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारने नीराचे पाणी थांबवले होते. नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकारने बारामतीला सोडण्यात येणारे नीरा डाव्या कालव्याचे पाणी थांबवले होते. नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

बारामतीला जाणारं पाणी पुन्हा सुरु

- भाजपा सरकारने थांबवलं होतं पाणी
- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
- नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा कॅबिनेट निर्णय
- याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील सगळ्यांना होईल
- डाव्या कालव्यात ५५ टक्के आणि उजव्या कालव्यात ४५ टक्के पाणी सोडणार
- नीरा डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील काही गावांना होणार आहे
- तर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्र हे पंढरपूर, सांगोला, खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यांचा समावेश आहे
- हे पाणी पिण्यासाठी, औद्योगिक आणि शेतीसाठी उपलब्ध होणार
- भाजप सरकार असताना बारामतीला जाणाऱ्या डाव्या कालव्याचे पाणी थांबवले होते 
- आता महाविकास आघाडी सरकरने निर्णय बदलला