Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Updated: Dec 31, 2022, 09:19 AM IST
Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही title=
new year 2023 mega block mumbai local time table latest Marathi news

Mumbai Mega Block : (New Year 2023) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 मुंबईत येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. (South Mumbai) दक्षिण मुंबईत असणाऱ्या अनेक ठिकाणांवर शहरातील नागरिकांसोबतच पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळणार आहे. तुम्हीही रविवारी मायानगरी मुंबईत (Mumbai Tour) भटकंती करण्याचा आणि त्यातूनही वेळ वाचवण्यासाठी रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. (new year 2023 mega block mumbai local time table latest Marathi news )

हेसुद्धा पाहा : Mumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील या भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट? 

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वांसाठीच ही बातमी महत्त्वाची बातमी कारण, मुंबईकरांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. (Central Railway) मध्य रेल्वेवर एक जानेवारीच्या रविवारी देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पनवेल-वाशी अप डाऊन हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक आहे. 

पश्चिम रेल्वेनं येणाऱ्यांना गिफ्ट... (Western Railway)

मध्य आणि उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असला तरीही, पश्चिम रेल्वेवर मात्र मेगा ब्लॉक नाहीये. त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करण्याऐवजी तुम्ही पश्चिम रेल्वेनं प्रवास करुन अपेक्षित स्थळी पोहोचू शकता. थोडक्यात रेल्वेकडून हे प्रवाशांना खास गिफ्टच आहे असं म्हणायला हरकत नाही. 

मध्य रेल्वेवर काय असेल परिस्थिती? 

रविवारच्या मेगाब्लॉकदरम्यान CSMT तून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील. तर, ठाण्यातून अप धीम्या मार्गांची वाहतूक मुलुंड - माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. एकंदर वाहतुक किमान 15 मिनिटं उशिरानं सुरु असे. 

हार्बर मार्गावरून प्रवास करताना या गोष्टी लक्षात घ्या 

रविवारी तुम्ही हार्बर मार्गानं प्रवास करत असाल, तर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. यामध्ये CSMT तून निघणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल पनवेल आणि बदलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल बंद असतील. ट्रान्स हार्बर लोकलही बंद असतील. फक्त बेलापूर, नेरुळ आणि खारकोपरमध्ये जाणाऱ्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील.