प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

 प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

Updated: Apr 25, 2018, 10:49 PM IST
प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी title=

नवी मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. सिडकोचे दक्षता अधिकारी विनय कारगावकर यांनी काही दिवसांपूर्वी सिडकोतील जे विमानतळ बाधित सुरक्षारक्षक आहेत. त्यांना घर खाली करा अन्यथा सिडको अस्थापनेतून काढून टाकू अशी धमकी दिली होती. त्यानुसार कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या विमानतळ बाधित 47 सुरक्षारक्षकांना सिडकोने आपल्या अस्थापनेतून काढून टाकले. सिडकोने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयावर प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केलीये. या निर्णया विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.