पवारांवर उद्धव यांची टीका, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली.

Updated: Aug 14, 2018, 06:44 PM IST
पवारांवर उद्धव यांची टीका, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली. सोमवारी मार्मिकचा ५८ वा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. उद्धव यांनी केलेल्या विधानाचा यावेळी निषेध केला. उद्दव ठाकरे यांना नॅपकिन आणि वाघ भेट देण्यासाठी या महिलांनी मातोश्रीमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक महिलांमध्ये झटापट झाली.