Supriya Sule : जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Arrest) यांनी अटक केल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय पाटील | Updated: Nov 11, 2022, 04:20 PM IST
Supriya Sule : जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : व्हीव्हीयाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या सिनेमाच्या (Har Har Mahadeb Cinema Controversy) वादावरुन झालेल्या मारहाणप्रकरणी माजी गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. वर्तकनगर पोलिसांनी हा कारवाई केली आहे. आव्हाडांना अटक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेते आक्रमक झालेत. या अटकेच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (ncp mp supriya sule first reaction on jitendra awhad arrest over to har har mahadev film controversy  marathi news)

सुळे काय म्हणाल्या? 

"राज्यात चाललंय काय याची मला गंमत वाटते. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो आंदोलन करतो त्याला शिक्षा. ब्रिटिश राजवटीचे दिवस मला आठवतायेत", अशा शब्दात सुळे यांनी आव्हाडांना केलेल्या कारवाईवरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

"आव्हाड लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवलंय. त्यांनंतर समजलं की त्यांच्या अटकेसाठी वरुन दबाव आहे. वरुन दबाव आहे म्हणजे कुठून हे मला माहिती नाही. मी कुणावरही आरोप करत नाही.  पोलिसांवर दबाव यतोय. यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. मी सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे पोलिसांना फोन येतायेत ही शक्यत नाकारता येत नाही", असं सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेच नमूद केलं.

"छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही"

"एखाद्या सिनेमात शिवाजी महाराजांबाबत चुकीचं दाखवलं गेलं असेल, त्याबाबत आवाज उठवल्याने अटक होत असेल तर आम्हा सर्वांना  जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही", असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं.