मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तारांची शरद पवार यांच्या कन्या (Sharad Pawar Daughters) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत बोलताना जीभ घरसली. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. दरम्यान आता सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचं पत्र राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलं आहे. (ncp followers wrote letter to cm eknath shidne on demand about minister abudl sattar resign)
सत्तारांचा 24 तासात मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच राजीनामा न घेतल्यास ठिय्या आंदोनल करु असा इशाराही राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
मराठवाड्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार होती. या सभेच्या नियोजनाची जबाबदारी सत्तारांकडे होती. याआधी सत्तारांवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न सुळेंनी केला होचा. या टीकेबाबत उत्तर देताना सत्तारांचे जीभ घसरली. "तुम्हालाही 50 खोके द्यायचे का?" तसेच इतकी भिकार@# झाली असेल तर तिलाही देऊ", अशा एकेरी भाषेत म्हणत गलिच्छ शब्दात सत्त्तारांनी टीका केली.